महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND Vs WI T20 : वेस्ट इंडिज विरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, विराट कोहलीसह 'या' खेळाडूला विश्रांती - वेस्ट इंडिज विरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

बीसीसीआयने वेस्ट इंडिज विरुद्धच्या ( IND Vs WI T20 ) टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली ( BCCI Announced Squad For West Indies T20is ) आहे. त्यामध्ये विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली ( No Virat Kohli In Squad For West Indies T20Is ) आहे. तर, केएल राहुल आणि कुलदीप यादवचे संघात पुनरागमन झालं आहे.

Virat Kohli jasprit bumrah
Virat Kohli jasprit bumrah

By

Published : Jul 14, 2022, 3:05 PM IST

हैदराबाद -भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या ( IND Vs WI T20 ) दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने भारतीय टी20 संघ जाहीर केला ( BCCI Announced Squad For West Indies T20is ) आहे. या संघाचे नेतृत्व कर्णधार रोहित शर्मा करणार आहे. तर, विराट कोहली ( No Virat Kohli In Squad For West Indies T20Is ) आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच, केएल राहुल आणि कुलदीप यादव यांचे संघात पुनरागमन झालं आहे.

'असा' असेल भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयश अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, असे संघात सामील करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे आहेत.

तर, केएल राहुल आणि यादव यांची तंदुरुस्ती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून विराट कोहली धावांसाठी झगडत आहे. इंग्लंड विरुद्ध सध्या सुरु असलेल्या पहिल्या एकदिवशीय सामन्याला तो कंबरदुखीच्या त्रासामुळे मुकला होता. आज ( 14 जुलै ) होणाऱ्या दुसऱ्या एकदिवशीय सामन्यालाही तो मुकण्याची शक्यता आहे. त्यातच आता वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर पडला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय भारतीय संघ - शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.

हेही वाचा -Aishwarya Jadhav Kolhapur : कोल्हापूरच्या ऐश्वर्याने विम्बलडनमध्ये फडकवला तिरंगा, सर्वात लहान वयात विम्बल्डन स्पर्धा खेळण्याचा मान

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details