गुवाहाटी: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने कबूल केले आहे, की टी-20 सामन्यांचे निकाल बहुतेक डेथ ओव्हर्स दरम्यान येतात. तसेच रोहितला त्याच्या सहकाऱ्यांनी योजना चांगल्या प्रकारे अंमलात आणण्याची इच्छा आहे. मात्र, सामन्याच्या निर्णायक टप्प्यावर आपल्या संघाच्या सातत्यपूर्ण संघर्षाची त्याला फारशी चिंता नाही. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर, भारताने रविवारी दुसऱ्या T20I ( IND vs SA 2nd T20 ) मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 बाद 237 धावा केल्या. पाहुण्या संघाने शेवटपर्यंत हार मानली नाही. पण अखेरीस भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर 16 धावांनी विजय मिळवत पहिली T20I मालिका ( IND won first T20I series against SA ) जिंकली.
सामन्यानंतर रोहित ( Captain Rohit Sharma ) म्हणाला, संघाला विशिष्ट पद्धतीने फलंदाजी आणि गोलंदाजी करायची आहे आणि आम्हाला तो आत्मविश्वास द्यायचा आहे. होय, गेल्या पाच-सहा सामन्यांमध्ये आम्ही डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केलेली नाही. विरोधी संघासोबतही आम्ही तेच करत आहोत. तो म्हणाला, डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी करणे खूप अवघड असते. इथेच खेळाचा निकाल ठरवला जातो. ही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही, परंतु आपल्याला सुधारावे लागेल आणि एकजुटीने खेळावे लागेल.
भारताच्या अव्वल चार फलंदाजांनी पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आणि रोहितने सांगितले की त्याला आपला अति-आक्रमक दृष्टिकोन सुरू ठेवायला आवडेल. रोहित म्हणाला, मी गेल्या आठ ते दहा महिन्यांत पाहिलं आहे की खेळाडू समोरून जबाबदारी घेत आहेत. संघासाठी काम करत आहेत. फारसा अनुभव नसलेल्या खेळाडूंनीही हे केले आहे.