महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND VS SA, 3rd Test : तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव; दक्षिण अफ्रिकेचा २-१ ने मालिका विजय - भारत दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका

तिसऱ्या व अंतिम निर्णायक कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताला नमवत मालिका खिशात घातली. दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून भारतावर विजय मिळवला. भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने ३ गड्याच्या मोबदल्यात पार केले. या विजयासह दक्षिण अफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांची ही मालिका २-१ ने जिंकली आहे.

Ind vs sa
Ind vs sa

By

Published : Jan 14, 2022, 5:50 PM IST

Updated : Jan 14, 2022, 7:06 PM IST

केपटाउन -भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात केपटाऊन येथे खेळल्या गेलेल्यातिसऱ्या व अंतिम निर्णायक कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताला नमवत मालिका खिशात घातली. दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून भारतावर विजय मिळवला. भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने ३ गड्याच्या मोबदल्यात पार केले. या विजयासह दक्षिण अफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांची ही मालिका २-१ ने जिंकली आहे.

भारताने कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर जोरदार कमबॅक करत दक्षिण अफ्रिकेने सलग दोन सामने जिंकले. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचं दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमवून २२३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिकन संघाने सर्वबाद २१० धावा केल्या. भारताला १३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा कसोटी सामना केपटाऊन येथे खेळविण्यात पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. भारताने दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य दिले होते. हे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने 63.3 षटकांत 3 विकेट्स गमावून पूर्ण केले. त्याचबरोबर तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

आज सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात आफ्रिकेने 2 बाद 101 धावांवरून पुढे खेळ सुरु केला. पीटरसन आणि डूसनने कोणताही धोका न पत्करता धावफलक सतत हालता ठेवला. पीटरसनने दुसऱ्या डावातही आपले अर्धशतक पूर्ण केले. चेतेश्वर पुजाराने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पीटरसनचा सोपा झेल सोडला होता. त्यानंतर पीटरसनने जलद गतीने धावा करत संघाची धावसंख्या 150 च्या पार पोहचवली. आफ्रिकेले जिंकण्यासाठी केवळ 62 धावांची गरज असताना शार्दुल ठाकुरने साउथ आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. ठाकूरने पीटरसनचा त्रिफळा उडवला. पीटरसनने 113 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. तिसऱ्या विकेटसाठी पीटरसन आणि डूसनने100 चेंडूत में 54 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टेम्बा बावुमा याने डूसनच्या साथीने भारतीय जलदगती गोलंदाजांचा निकराने सामना करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. उपहारापर्यंत साउथ आफ्रिकेने तीन बाद 171 धावा केल्या होत्या व त्यांना जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांची गरज होती. उपहारानंतर खेळ सुरू झाला आणि आफ्रिकेने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रासी वैन डेर डूसन (नाबाद 41) आणि टेम्बा बावुमा ( नाबाद 32) धावा काढून विजयात मोलाचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक -

भारत 223 आणि दुसरा डाव 67.3 फटकांत 198/10 (ऋषभ पंत 100 नाबाद, कर्णधार विराट कोहली 29, मार्को जेनसेन 4/36, कगिसो रबाडा 3/53) दक्षिण आफ्रिका 210 आणि दुसरा डाव 63.3 षटकांत 212/3 (कीगन पीटरसन 82, रस्सी वैन डेर डूसन नाबाद 41 आणि टेम्बा बावुमा नाबाद 32, मोहम्मद शमी 1/41, जसप्रीत बुमराह 1/54, शार्दुल ठाकुर 1/22).

भारताचा पहिला डाव -

आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात 77.3 षटकांत सर्वबाद 223 धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून सर्वाधिक धावा कर्णधार विराट कोहलीने केल्या होत्या. त्याने 79 धावांची खेळी साकारली होती. त्यामुळे भारतीय संघाने दोनशे धावांचा टप्पा पार केला होता. तसेच दक्षिण आफ्रिका संघाकडून सर्वाधिक विकेट्स कगिसो रबाडाने घेतल्या होत्या. त्याने 4 विकेट्स घेतल्या, तर जनसेनने 3 विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव -

दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या पहिल्या डावात 76.3 षटकांत सर्वबाद 210 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून कीगन पीटरसनने शानदार 72 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघ 210 धावा करु शकला. तसेच भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर उमेश यादव आणि शमीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 13 धावांची आघाडी घेतली.

भारतीय संघाचा दुसरा डाव -

दुसर्‍या डावात भारतीय संघाच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजीची आघाडीचे फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्यामुळे भारतीय संघाचा दुसर्‍या डावातील मार्ग खडतर झाला होता. परंतु यष्टिरक्षक रिषभ पंतने एक बाजू लावून धरत आपले शतक पूर्ण केले. मात्र एकाबाजूने पडझड सुरूच होती. अखेर भारतीय संघाचा दुसरा डाव 67.3 षटकांत संपुष्टात आला. त्यामुळे भारतीय संघ दुसर्‍या डावात सर्वबाद 198 धावा करू शकला. परंतु यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत 100 धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिका संघाकडून सर्वाधिक तीन-तीन विकेट्स रबाडा आणि एन्गिडी यांनी घेतल्या.

दक्षिण आफ्रिका दुसरा डाव -

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 212 धावांचे 3ाव्हान 63.3 षटकांत 3 विकेट्स गमावून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून कीगन पीटरसनने शानदार 62 धावा केल्या. त्याचबरोबर टेम्बा बावुमा आणि रसी डूसेन अनुक्रमे 32 आणि 41 धावांवर नाबाद राहिले. भारताकडून बुमराह, शमी आणि ठाकुर यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

Last Updated : Jan 14, 2022, 7:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details