कटक:भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील आज दुसरा सामना ( IND vs SA 2nd T20 ) खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 148 धावांची माफक धावसंख्या उभारली. गोलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्टीवर भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका संघापुढे 149 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम खेळणाऱ्या भारतीय संघाने ऋतुराज गायकवाडची ( Batsman Rituraj Gaikwad ) विकेट गमावली. तो 1 धावा करून बाद झाला. येथून इशान किशन आणि श्रेयस अय्यरने मिळून दुसऱ्या विकेट्ससाठी 48 धावा जोडल्या. दरम्यान, इशान किशन 21 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याची बॅटही चालली नाही. दोघांनी अनुक्रमे 5 आणि 9 धावा केल्या.