लखनौ :भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्यावनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात(IND vs SA 1st ODI) दक्षिण आफ्रिकेने भारताचा 9 धावांनी पराभव (South Africa defeated India by 9 runs) केला. तत्पूर्वी, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 250 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण प्रत्युत्तरात भारताचा संघ 8 विकेट्सवर 240 धावाच करू (IND vs SA 1st ODI Match) शकला.
पावसामुळे अडथळा -नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली (Match Report) होती. पावसाने प्रभावित झालेल्या 40 षटकांच्या सामन्यात प्रोटीज संघाने 4 गडी गमावून 249 धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने दोन बळी घेतले. त्याचवेळी कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेन (६५ चेंडूत ७४ धावा) आणि डेव्हिड मिलर (६३ चेंडूत ७५) यांनी १०६ चेंडूंत १३९ धावांची भागीदारी केल्यामुळे प्रोटीज संघाने ४० षटकांत ४ गडी गमावून २४९ धावा केल्या. नाणेफेक 1.30 नंतर 2:45 वाजता होणार होती. सामना 3:00 वाजता सुरू होणार होता, परंतु तो सुरू होऊ शकला नाही. पाऊस थांबल्यावर सामना 3.45 वाजता नाणेफेक झाली. मात्र, सामना उशिरा सुरू झाल्यामुळे 10-10 षटके कमी करण्यात (South Africa defeated India) आली.