महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ind vs NZ: Mayank become Man of the Match and Ashwin Man of the Series : मयंक बनला मॅन ऑफ द मॅच तर अश्विन मॅन ऑफ द सीरिज

भारत विरूध्द न्यूझीलंड (Ind vs NZ) टेस्ट सीरीजच्या दुसऱ्या मॅच नंतर भारतीय टिमचा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) मॅन ऑफ द मॅच (man of the match) चा किताब मीळाला आहे. त्याने दोन्ही मॅच मधे शानदार फलंदाजी केली. तर आर अश्विन (Ashwin) ला मॅन ऑफ द सीरिज (man of the series) बनला आहे.

Man of the Match
मयंक, अश्विन

By

Published : Dec 6, 2021, 3:05 PM IST

मुंबई: वानखेडे स्टेडियमवर तीन डिसेंबर पासून सुरू असलेल्या भारत विरूध्द न्यूझीलंडच्या दुसऱ्या आणि शेवटचा टेस्ट मॅच पहिल्या दिवशी पावसामुळे दुपारी 12 वाजता सुरू झाला. ज्यात भारताने टाॅस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी 10 विकेट घेत न्यूझीलंडच्या टीम ला 167 रनांवर रोकले, आणि सिरीज ताब्यात घेतली. यात मयंक अग्रवाल मॅन ऑफ द मॅच तर रविचंद्रन अश्विन मॅन ऑफ द सीरिज बनला आहे.
पहिल्या डावात न्यूझीलंडने 10 विकेट घेऊन भारतीय टीमला 325 रनांवर रोकले होते. सलामीचा फलंदाज मयंक अग्रवालने शानदार खेळ करत शतक ठोकले. त्याने 311 चेंडूंचा सामना करताना 4 षटकार तर 17 चौकारांच्या मदतीने 150 रन बनवले, तर अक्षर पटेल ने 52 रन करत अर्धशतक केले. न्यूझीलंचा फिरकी गोलंदाज एजाज पटेल याने एकट्याने 47.5 ओव्हर मधे 119 रन देत भारतीय टीमच्या 10 फलंदाजांना मैदानावरून वापस पाठवले. ज्यात शुभमन गिल 44 रन बनवुन राॅस टेलरच्या हाहात कॅच देऊन बसला. चतेश्वर पुजारा आपले खातेही उघडू शकला नाही. विराट कोहली और रिद्धिमान साहा पण एजाजच्या बाॅलवर एलबीडब्लयू आऊट झाले. श्रेयस अय्यर ला पटेल ने कॅच आउट तर आर अश्विनला आउट केले, मयंक अग्रवाल ला 150 वर, अक्षर पटेल 52, जयंत यादव 12 आणि मोहम्मद सिराज 4 रन वर आउट करत वापस पाठवले. यात पटेल ने तीन फलंदाजांना एलबीडब्लयू, दोन जनांना क्लीन बोल्ड तर पांच फलंदाजांना कॅच आउट केले.
भारतीय टीम ने 325 रनांचा मोठे आव्हान उभे केले होते. त्याला उत्तर देण्यासाठी फलंजाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड टीम वर भारतीय गोलंदाजांनी 62 रनांनी विजय मिळवला. ज्यात अश्विन ने 4 मोहम्मद सिराज ने 3 अक्षर पटेल ने 2 तर जयंत यादव ने एक विकेट घेत रोखले.
तीसऱ्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय टीम ने पुन्हा 70 ओव्हर मधे 7 विकेट देत 276 रन करत दुसरा डाव संपवला. न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजाने पुन्हा 26 ओव्हर मधे 106 रन देत भारतीय टीमच्या 4 विकेट घेतल्या सचिन रविंद्र ने 13 ओव्हर मधे 56 रन देत तीन विकेट प्राप्त केल्या न्यूझीलंडला जिंकण्यासाठी आता 540 रनांची जरूरी होती. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड टीमने 10 विकेट देत 167 रन बनवले. भारताने आपले रेकाॅर्ड तोडत 5 वर्षानी तगडे आव्हान उभा करत टेस्ट सामन्यात 372 रनांनी विजय मिळवला आहे. यापुर्वी 2016 मधे न्यूझीलंडच्या विरोधात 321 रन, 2015 मघे साउथ अफ्रीकेच्या विरोधात 337 रन तर ऑस्ट्रलियाच्या विरोधात 320 रनांनी विजय मिळवला होता. तसेच सगळ्यात जास्त विकेट घेणारे भारतीय गोलंदाजआर अश्विन (300) याने कपिल देव (219) आणि हरभजन सिंह (265) चे रिकॉर्ड तोडत अनिल कुंबले (350) नंतर दुसऱ्या क्रमांकावर आपले नाव नोंदवले आहे. न्यूझीलंडच्या एजाज पटेल ने या मालिकेत सगळ्यात जास्त विकेट घेत तीसरा असा खेळाडू बनला आहे ज्याने एकाच डावात 10 विकेट घेत इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. यापुर्वी 1999 मधे भारताचा माजी क्रिकेटर अनिल कुंबले ने तर 1956 मधे इंग्लैंडचा माजी गोलंदाज जिम लेकर ने हा पराक्रम केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details