महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, बेन स्टोक्सची माघार - भारताचा इंग्लंड दौरा 2020

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने या दौऱ्यातून माघार घेतली आहे. काही काळासाठी क्रिकेटपासून लांब राहणार असल्याचे स्टोक्सने सांगितलं आहे.

ind vs eng test series : Ben Stokes takes indefinite break from cricket
भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, बेन स्टोक्सची माघार

By

Published : Jul 31, 2021, 12:37 PM IST

लंडन - भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्याआधीच इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने या दौऱ्यातून माघार घेतली आहे. काही काळासाठी क्रिकेटपासून लांब राहणार असल्याचे स्टोक्सने सांगितलं आहे.

बेन स्टोक्सने वैयक्तिक कारणामुळे भारताविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली. सध्या आपण क्रिकेटच्या कोणत्याही सामन्यासाठी उपलब्ध राहू शकणार नसल्याचेही त्याने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डला (ईसीबी) सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या धोक्यामुळे सर्वच क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवत आहेत. मात्र याचा खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होताना पाहायला मिळत आहे. बेन स्टोक्सने याच कारणामुळे माघार घेतल्याची माहिती मिळत आहे.

आयसीसीनेही बेन स्टोक्सने माघार घेतल्याची माहिती दिली. तर ईसीबीने बेन स्टोक्सचा हा निर्णय धाडसी असल्याचे म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बेन स्टोक्सने काही काळापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून स्वत:ला वेगळे केले आहे.

हेही वाचा -Tokyo Olympics : भाऊ.. लवलिनानं उपांत्य फेरी गाठताच पदक पक्कं केलं, पण सिंधूचं का झालं नाही?

हेही वाचा -Tokyo Olympics : पोरींची कमाल! रोमांचक सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने आफ्रिकेला नमवलं

ABOUT THE AUTHOR

...view details