लंडन -आगामी चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळेल, याची काही गँरंटी नाही. कारण यजमान संघ जेम्स अँडरसनला पुढील सामन्यात विश्रांती देण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा संघ गोलंदाजांना रोटेट करणार आहे.
इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी जेम्स अँडरसन आणि ऑली रॉबिन्सन यांच्या वर्कलोडविषयी सांगितलं की, मी यांना ब्रेक देऊ इच्छित नाही. आमच्या पुढे खूप सामने आहेत. कसोटी क्रिकेट वेगवान होत आहे आणि यामुळे अडचणी वाढत आहेत.
दोन्ही खेळाडू चांगले योगदान देत आहेत. दिवसाचा खेळ संपल्यानंतर आम्ही यांच्यासाठी काही करू शकतो का याचा विचार आम्ही करतो. पण अद्याप आम्ही यांच्याविषयी काही निर्णय घेऊ शकलेलो नाही. जेम्स अँडरसन मालिकेतील प्रत्येक सामना खेळू इच्छित आहे. पण वर्कलोड मॅनेजमेंट पाहता इंग्लंड जेम्स अँडरसनला आराम देऊ शकतो, असे देखील ख्रिस सिल्वरवूड यांनी सांगितलं.