महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs ENG : भारतीय क्रिकेटरचे दुखापतीमुळे कसोटी पदार्पणाचे स्वप्न भंगले - बीसीसीआय

आवेश खान डरहममध्ये भारताच्या प्रथम श्रेणी सराव सामन्यात पहिला दिवशी काउंटी इलेव्हनकडून खेळताना दुखापतग्रस्त झाला. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. यामुळे तो सामन्याला तर मुकलाच त्याशिवाय तो इंग्लंडच्या संपूर्ण दौऱ्यातून देखील जवळपास बाहेर झाला आहे.

IND vs ENG : avesh khan probably out of england tour due to fracture in right hand thumb india vs england
IND vs ENG : भारतीय क्रिकेटरचे दुखापतीमुळे कसोटी पदार्पणाचे स्वप्न भंगले

By

Published : Jul 22, 2021, 3:51 PM IST

Updated : Jul 22, 2021, 4:08 PM IST

लंडन - युवा गोलंदाज आवेश खान डरहममध्ये भारताच्या प्रथम श्रेणी सराव सामन्यात पहिला दिवशी काउंटी इलेव्हनकडून खेळताना दुखापतग्रस्त झाला. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. यामुळे तो सामन्याला तर मुकलाच त्याशिवाय तो इंग्लंडच्या संपूर्ण दौऱ्यातून देखील जवळपास बाहेर झाला आहे. कोरोना झालेल्या खेळाडूंच्या संपर्कात आल्यानंतर काउंटी इलेव्हनचे काही खेळाडूंना क्वारंटाइन व्हावे लागले होते. यामुळे वेगवान गोलंदाज आवेश खान यजमान संघाकडून प्रतिनिधीत्व करत होता.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, स्टँडबाय खेळाडू आवेश खान दुखापतीमुळे काही महिने क्रिकेट खेळू शकणार नाही आणि चार ऑगस्टपासून नॉर्टिघमच्या ट्रेंटब्रिजमध्ये सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेआधी भारतीय संघातील एक नेट गोलंदाज कमी झाला आहे.

बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं की, "आवेश खान सराव सामन्याला तर मुकलाच याशिवाय तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून देखील जवळपास बाहेर गेला आहे. त्यांचा अंगठा फॅक्चर झाला आहे. तो कमीत कमी एक महिने गोलंदाजी करू शकत नाही. पुढील तीन दिवसात आवेश खानबद्दलची स्थिती स्पष्ट होईल."

बीसीसीआयने बुधवारी आवेश खानच्या दुखापतीविषयी विस्तारमध्ये सांगितलं नाही. परंतु त्यांनी आवेश खान मेडिकल टीमच्या निघराणीत आहे. सराव सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी तो खेळणार नाही, असे सांगितलं. दरम्यान, मंगळवारी आवेश खानला उपहारानंतर दुखापत झाली होती. वैयक्तिक 10वे षटक फेकताना हनुमा विहारीने मारलेला फटका रोखताच्या प्रयत्नात आवेश खानचा अंगठा फॅक्चर झाला.

आवेश खानच्या डेब्यूचे स्वप्न भंगले -

24 वर्षीय आवेश खानने आतापर्यंत 26 प्रथम श्रेणी सामन्यात 100 गडी बाद केले आहे. क्रिकेट तज्ञांच्या मते, आवेश खानला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता होती.

हेही वाचा -SL vs IND १st ODI : भारतीय संघाची विजय सलामी, पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव

हेही वाचा -भारतासाठी आनंदाची बातमी, ऋषभ पंतची कोरोनावर मात

Last Updated : Jul 22, 2021, 4:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details