बर्मिंगहॅम :भारत विरुद्ध इंग्लंड ( IND VS ENG ) संघात खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यातील आज तिसरा दिवस आहे. इंग्लंड संघाने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 5 बाद 84 धावांवरुन पुढे सुरुवात केली होती. मात्र इंग्लंडचा पहिला डाव 61.3 षटकांत 284 धावांवर गारद झाला. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावाच्या जोरावर 132 धावांची आघाडी ( India lead by 132 runs ) मिळाली.
त्यावेळी बेन स्टोक्स (0) सह जॉनी बेअरस्टो (12) क्रीजवर उपस्थित होते. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स ( Captain Ben Stokes ) (25) 149 धावसंख्यवर सहाव्या विकेट्सच्या रुपाने बाद झाला. त्याचा उत्तम झेल जसप्रीत बुमराहाने शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर टिपला. ज्यामुळे बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोची 65 धावांची भागीदारी संपुष्टात आली.
त्यानंतर जॉनी बेअरस्टोने इंग्लंड संघाचा डाव सावरला. त्याने 140 चेंडूंचा सामना करताना 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 104 धावा ( Johnny Bairstow century ) केल्या. त्यामुळे इंग्लंडला आपला डाव सावरण्यात यश आले. सॅम बिलिंग्ज आणि बेअरस्टोने सातव्या विकेट्साठी शानदार 92 धावांची भागीदारी उभारली. ज्यामध्ये बिलिंग्जने धावांचे योगदान दिले. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड (1), मॅटी पॉट्स (19) आणि जेम्स एंडरसन (6) धावांचे योगदाने दिले. त्यामुळे इंग्लंड संघाला आपल्या पहिल्या डावात 61.3 षटकांत सर्वबाद 284 धावाच करता आल्या. म्हणून इंग्लंडचा संघ 132 धावांनी पिछाडीवर आहे.
भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स ( Mohammed Shami took 4 wickets ) घेतल्या. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहने 3 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या पहिल्या डावाला सुरुंग लावला.
हेही वाचा -Kohli Bairstow Argument : 'तोंड बंद ठेवून फलंदाजी कर..', जॉनी बेअरस्टोला भिडला विराट, पंचांना करावा लागला हस्तक्षेप