नवी दिल्ली : तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका टीम इंडियाने गमावली आहे. टीम इंडियाने ही एकदिवसीय मालिका 2-1 ने गमावली. यासोबतच टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मार्कस स्टॉइनिस यांच्यात मैदानावर जोरदार बाचाबाची झाली. विराट कोहलीसोबत मैदानावर अनेकवेळा ऑस्ट्रेलियन खेळाडूंमधले काही टोकदार वाद पाहायला मिळतात. सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. त्यामध्ये कोहलीची संतप्त प्रतिक्रिया स्पष्टपणे दिसत आहे. त्यात कोहली चांगलाच संतापलेला दिसत आहे. शेवटी किंग कोहलीला एवढा राग कशाचा?
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल :ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यात 22 मार्च रोजी चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर तिसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभव स्विकारावा लागला होता . सामन्यादरम्यान, भारतीय संघाचा किंग कोहली मैदानावर एका किंवा दुसर्या खेळाडूशी वाद घालतो. असाच काहीसा प्रकार या वनडेतही घडला आहे. कांगारू संघाचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस मैदानावर विराट कोहलीला भिडला. भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, दोन्ही खेळाडूंमधील ही टक्कर अचानक झालेली नाही.