हैदराबाद: विश्वचषकापूर्वीच भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात संघाचा ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 66 धावांनी पराभव झाला. राजकोटमध्ये ऑस्ट्रेलियन संघानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. 50 षटकात 7 गडी गमावून 352 धावा केल्या. ही मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात भारतीय संघ 49.4 षटकांत 286 धावांत गारद झाला.
भारतीय संघ 286 धावा करून बाद : भारताला सामना जिंकण्यासाठी 353 धावांचं लक्ष्य होतं, परंतु संघ 286 धावा करू शकला. संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 81 धावा केल्या. त्याच्याशिवाय विराट कोहलीने 56 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 40 धावांत सर्वाधिक 4 बळी घेतले. मात्र मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने ही मालिका 2-1 अशी खिशात घातली आहे.
रोहित वॉशिंग्टनची अर्धशतकी भागीदारी :भारतीय कर्णधार रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर यांनी 78 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी 65 चेंडूंचा सामना केला. 11व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर मॅक्सवेल लॅबुश्नेक झेलबाद झाला. सुंदरला वाइड लाँग ऑफवर मोठा फटका खेळायचा होता, पण चौकाराच्या आधी तो बाद झाला.
ऑस्ट्रेलियाचं भारताला 353 धावांचं लक्ष्य : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला गेला. ऑस्ट्रेलियानं भारताला 353 धावांचं मोठं लक्ष्य होतं. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघानं 50 षटकात 7 गडी गमावून 352 धावा केल्या. भारताला सामना जिंकण्यासाठी 353 धावा करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून चार फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली. डेव्हिड वॉर्नरनं 56, मिचेल मार्शनं 96, स्टीव्ह स्मिथनं 74, लॅबुशेननं 72 धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहनं 10 षटकात 81 धावा देत 3 बळी घेतले. कुलदीप यादवनं 6 षटकांत 48 धावा देत 2 बळी घेतले. सिराज आणि प्रसीद कृष्णानं प्रत्येकी एक विकेट घेतली.
मार्श 96 धावांवर बाद : मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथनं दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केलीय. दोघांनीही अर्धशतके झळकावली आहे. मार्शनं एकदिवसीय कारकिर्दीतील 17 वे अर्धशतक पूर्ण केलंय, तर स्टीव्ह स्मिथनेही 30 वं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र मार्शचं शतकाचं स्वप्न कुलदीपनं भंगवलं आहे. त्यानं मार्शला 96 धावांवर बाद केलं. स्मिथला सिराजनं 74 धावांवर बाद केलं.