महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND VS AFG 1ST T20 : भारताचा अफगाणिस्तानवर सहा विकेट्स राखून शानदार विजय; मालिकेत आघाडी - भारताचा विजय

India vs Afghanistan 1st T20 Match : भारतीय संघ अफगाणिस्तान विरुद्ध तीन सामन्यांची टी 20 सिरीज खेळत आहे. या सिरीजमधील पहिला टी 20 सामना मोहाली येथे खेळवला गेला. यात भारतानं 6 विकेट्सनं अफगाणिस्तानवर विजय मिळवलाय. तसंच सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 8:17 PM IST

Updated : Jan 11, 2024, 10:53 PM IST

मोहाली : India vs Afghanistan 1st T20 Match :मोहाली येथे भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यामध्ये पहिला टी 20 सामना झाला. तीन सामन्याच्या टी 20 मालिकेत आगामी टी 20 विश्वचषकाची तयारी सुरू आहे. टी 20 चा पहिलाच सामना भारतानं अफगाणिस्तानवर सहा गडी राखून विजय मिळवलाय. भारताचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इब्राहिम जादरानच्या नेतृत्वातील अफगाणिस्तानं भारतासमोर 159 धावांचं टार्गेट दिलं होतं.

159 धावांचं दिलं होतं टार्गेट : भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर टी 20 सिरीजमधील पहिला सामना खेळवण्यात आला. भारतीय संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलं. यावेळी अफगाणिस्तान टीमकडून मोहम्मद नबीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. त्यानंतर अजमतुल्ला उमरझाईने 29, इब्राहिम झद्रानने 25, रहमानउल्ला गुरबाजने 23, नजीबुल्ला झद्रानने 19 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या टीमने 5 विकेट्स गमावून भारताला विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं होतं.

शिवम दुबेनं डाव सावरला : आव्हान पूर्ण करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला मैदानात उतरले. मात्र, जोडी पहिल्या सामन्यात चांगला खेळ खेळू शकली नाही. रोहित शर्मा शून्यावर तर गिल 23 धावा करून बाद झाला. यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबेनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबेनं भारताकडून सर्वाधिक 60 धावा केल्या तर तिलक वर्मानं 26, जितेश शर्मानं 31 आणि रिंकू सिंहनं 16 धावा केल्या. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेलं आव्हान 6 विकेट्स आणि 17.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

दोन्ही टीमच्या प्लेइंग-11

भारत :रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकिपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार

अफगानिस्तान : रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकिपर), इब्राहिम जादरान (कॅप्टन), रहमत शाह, अजमतुल्लाह उमरजई, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, करीम जनत, फजलहक फारूकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान

Last Updated : Jan 11, 2024, 10:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details