धर्मशाला Cricket World Cup २०२३ : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं २०२३ विश्वचषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यातच खळबळ उडवून दिली. त्यानं धर्मशाला येथे न्यूझीलंडविरुद्ध ५४ धावा देत ५ बळी घेतले.
भारताकडून ५ बळी घेणारा पहिला गोलंदाज : विश्वचषक २०२३ चा २१ वा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात धर्मशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमीला संधी देण्यात आली होती. ही संधी त्यानं दोन्ही हातांनी स्वीकारत तिचं सोनं केलं. यंदाच्या विश्वचषकात भारताकडून ५ बळी घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे. शमीनं विल यंगला ९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर १७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवून पहिली विकेट मिळवली. यानंतर शमीनं धोकादायक रचिन रवींद्रला ७५ धावांवर शुभमन गिलकडे झेलबाद करून आपली दुसरी विकेट मिळवली.
दोन चेंडूत दोघांना बाद केलं : मोहम्मद शमी इथेच थांबला नाही. त्यानं न्यूझीलंडच्या डावाच्या ४८ व्या षटकात दोन फलंदाज बाद केले. षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्यानं मिचेल सँटनरला १ रन्सच्या वैयक्तिक स्कोअरवर शानदार यॉर्कर टाकून बाद केलं. पुढच्याच चेंडूवर शमीनं मॅट हेन्रीला ० च्या स्कोअरवर तंबूत पाठवलं. डावाच्या शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर शमीनं डॅरिल मिशेललाही बाद केलं. शमीनं मिशेलला १३० धावांवर विराट कोहलीकरवी झेलबाद करून आपल्या पाच विकेट पूर्ण केल्या.
न्यूझीलंडविरुद्ध बदला घेतला :या सामन्यातील शानदारी गोलंदाजीसह मोहम्मद शमीनं वनडे वर्ल्ड कप २०१९ च्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला. तो २०१९ च्या भारतीय विश्वचषक संघाचा भाग होता. या विश्वचषकात टीम इंडियाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. शमीनं एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत १२ सामन्यात ३६ विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद शमीचा हा दुसरा विश्वचषक आहे.
हेही वाचा :
- Dharamshala Stadium News : जगातील सर्वाधिक उंचीवर असलेलं धर्मशाळेचं मैदान कसं तयार करण्यात आलं?
- Cricket World Cup 2023 : यंदाच्या विश्वषकाच्या अंतिम सामन्यात दिसू शकतात 'हे' दोन संघ; बीसीसीआयचे माजी निवडकर्ते सुरेंद्र भावे यांचे भाकित