पुणे Cricket World Cup 2023 ENG vs NED : यंदाच्या क्रिकेट विश्वचषकाचा 40 वा सामना आज इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे. दोन्ही संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. गतविजेत्या इंग्लंडनं या विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करत आतापर्यंत 7 सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकलाय. यामुळं गतविजेते इंग्लंड गुणतालिकेत तो दहाव्या स्थानावर आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रतेसाठी दोन्ही संघांची कसरत : या विश्वचषकात नेदरलँड्सने 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत. इंग्लंडचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला असला तरी नेदरलँड्सविरुद्ध खेळताना या विश्वचषकात आपली शान वाचवण्याचा प्रयत्न करतील. इंग्लंडनं आपला मागील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 33 धावांनी हरला होता. दुसरीकडे, नेदरलँड्सनं आपला मागिल सामना अफगाणिस्तानविरुद्ध गमावला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पात्रतेसाठी दोन्ही संघांचे उर्वरित सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळं पुढील आयसीसी वनडे स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी दोन्ही संघ अव्वल आठमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतील. उभय संघांमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यांबद्दल बोलायचं तर उभय संघांमध्ये आतापर्यंत 6 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये इंग्लंडने सर्व सामने जिंकले आहेत.
- या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यासाठी इंग्लंड संघात दोन तर नेदरलँड्स संघात एक बदल करण्यात आलाय.