नवी दिल्ली Cricket World Cup 2023 : गुरूवारी ICC पुरुष क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यात न्यूझीलंडनं श्रीलंकेवर 160 चेंडू तसंच पाच गडी राखून विजय मिळवलाय. यामुळं त्यांची धावगती +0.743 पर्यंत वाढली आहे आणि उपांत्य फेरीतील त्यांचं स्थान निश्चित झालंय. न्यूझीलंडनं भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्कं केलंय. श्रीलंकेवर न्यूझीलंडचा जोरदार विजय म्हणजे स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं स्वरूप काहीतरी नाट्यमय घडलं तरच बदलू शकतं. गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर राहण्याची अपेक्षा आहे, तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहतील. न्यूझीलंडनं श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानसासाठी उपांत्य फेरीचं समीकरण समोर आलंय. पाकिस्तानला इंग्लंडविरोधात अतिशय मोठा विजय मिळवावा लागणार आहे.
पाकिस्तांनसाठी नेमकं समीकरण काय : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात जर पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी केली तर त्यांना किमान 287 धावांच्या फरकानं विजय मिळवावा लागणारआहे. जर ते धावांचा पाठलाग करत असतील तर त्यांना इंग्लंडला 50 धावांवर बाद करावं लागेल आणि या लक्ष्याचा पाठलाग अवघ्या दोन षटकांत किंवा तीन षटकांत करावा लागेल. प्रत्यक्षात हे सर्व पर्याय अशक्य वाटतात.
इंग्लंडची प्रथम फलंदाजी आल्यास :शनिवारी इंग्लंडनं प्रथम फलंदाजी केल्यास पाकिस्तानचं आव्हान तेव्हाच संपुष्टात येईल. इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना जर 300 धावांपर्यंत मजल मारली. तर पाकिस्तानला हे आव्हान फक्त सहा षटकात पार करावं लागेल. तेव्हाच त्यांची धावगती न्यूझीलंडपेक्षा चांगली होईल. त्यामुळं पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टातच आल्यात जमा आहे.
अफगाणिस्तानचंही आवाहन संपुष्टात : पाकिस्तानपेक्षाही उपांत्य फेरी गाठण्याची अफगाणिस्तानची शक्यता आणखी कमी आहे. कारण त्यांची धावगती पाकिस्तानपेक्षाही कमी आहे. आज अहमदाबादमध्ये त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना आफ्रिका संघाचा तब्बल 438 धावांनी पराभव करावा लागेल, जे जवळपास अशक्य आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना अफगाणिस्तान संघासाठी या विश्वचषकातील शेवटचा सामना असू शकतो. अफगाणिस्तान संघानं या विश्वचषकात 8 पैकी 4 सामने जिंकून चमकदार कामगिरी केलीय. त्यांनी इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना पराभूत केलंय.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 SA vs AFG : आफ्रिकेची फलंदाजी आणि अफगाणच्या फिरकीमध्ये अहमदाबादेत रंगणार 'युद्ध'
- Cricket World Cup २०२३ : भारतात न्यूझीलंड संघाचे चाहते जास्त; चिन्नास्वामी स्टेडियमवर अलोट गर्दी
- Cricket World Cup 2023 NZ vs SL : न्यूझीलंडचा श्रीलंकेवर पाच गडी राखून विजय, न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या जवळ