हैदराबाद Anushka Sharma Showers Praises Virat Kohli : विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी झालेल्या उपांत्य सामन्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानं जल्लोषाचं वातावरण आहे. या आनंदाच्या प्रसंगात भर घालत, विराट कोहलीनं बुधवारच्या सामन्यात एक उल्लेखनीय टप्पा गाठलाय. त्यानं त्याचं 50 वे एकदिवसीय शतक झळकावलं आणि एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक शतकांचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. यानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानं त्याच्या या कर्तृत्वाबद्दल तिचं कौतुक करण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक खास स्टोरी टाकलीय.
- अनुष्कानं स्टोरीत काय लिहिलंय : अनुष्कानं तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये लिहिलंय की, 'देव हा सर्वोत्तम पटकथा लेखक आहे. तुझ्या प्रेमानं मला आशीर्वाद दिल्याबद्दल आणि वर्षानुवर्षे त्याची वाढ आणि यश पाहिल्याबद्दल देवाचे आभार. स्वतःशी आणि खेळाशी प्रामाणिक राहण्यासाठी तु खरोखरचं देवाचा मुलगा आहेस. अशा शब्दांत अनुष्कानं आपला पती विराटचं कौतुक केलय.
- संपूर्ण सामन्यात अनुष्कानं केलं चिअर : संपूर्ण सामन्यात, अनुष्कानं तिच्या पतीची सर्वात मोठी चीअरलीडर म्हणून चांगलाच पाठिंबा दर्शवला. तिनं स्टँडवरून विराट कोहली आणि संपूर्ण भारतीय संघासाठी उत्कटतेनं चीअर केलं. विराटनं शतक ठोकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर निखळ आनंद आणि उत्साह होता.