मेलबर्न - टी-20 विश्वकरंडक स्पर्धा यावर्षी यूएई आणि ओमानमध्ये होणार आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ सक्षम असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिगने व्यक्त केलं आहे.
ऑस्ट्रेलिया बोर्डाने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात अनकॅप्ड यष्टीरक्षक खेळाडू जोस इंग्लिस याला संधी देण्यात आली आहे. तर अनुभवी खेळाडू म्हणून मॅथ्यू वेड देखील आहे. ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर रिकी पाँटिगने ट्विट करत आनंद व्यक्त केला.
रिकी पाँटिग त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'जोशला मिळालेली संधी पाहून आनंद झाला. तो सहज खेळणारा उत्तम खेळाडू आहे. ओवरऑल पाहता सर्व संघ चांगला आहे. माझ्या मते, हा संघ टी-20 विश्वकरंडक जिंकण्यासाठी सक्षम आहे.'