मोहाली : भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला 4 मार्च पासून सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघाचा नेटमध्ये सराव सुरु आहे. या सराव सत्रात आर. आश्विन देखील संहभागी आहे. त्याच्याबद्दल कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहाने ( Vice-captain Jaspreet Bumrah ) प्रतिक्रिया दिली आहे.
उपकर्णधार जसप्रीत बुमराहने मंगळवारी उघड केले की, रविचंद्रन अश्विन तंदुरुस्त ( Ravichandran Ashwin fit ) आहे आणि सराव सत्रात चांगला दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेपूर्वी 4 मार्च रोजी येथील कसोटीत अनुभवी ऑफस्पिनरचा समावेश करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताकडून शेवटचा खेळलेला अश्विन दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेतून बाहेर पडला होता. नंतर, जेव्हा बीसीसीआयने श्रीलंका कसोटीसाठी संघाची घोषणा केली. तेव्हा ऑफस्पिनरचा सहभाग फिटनेसच्या अधीन असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मंगळवारी बीसीसीआयच्या ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये हा अनुभवी खेळाडू आयएस बिंद्रा पीसीए इंटरनॅशनलमध्ये स्टेडियम ( IS Bindra PCA International Stadium ) दिसला. तो भारतीय कसोटी क्रिकेट संघातील अनेक सदस्यांसह नेटमध्ये घाम गाळताना दिसला.
जसप्रीत बुमराहा म्हणाला ( Jaspreet Bumraha said ), ''अश्विन तंदुरुस्त आहे. मला कोणत्याही तक्रारीची माहिती नाही. तो चांगला दिसत होता आणि आज प्रशिक्षणात सर्वकाही केले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केले. आशा आहे की कसोटी मालिकेपूर्वी कोणतीही अडचण येणार नाही. आम्ही एक पर्यायी सत्र केले आहे, आतापर्यंत सर्व काही ठीक होते. अद्याप कोणतीही अडचण नाही, त्यामुळे आम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.''