चेन्नई -इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील मोठ्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. कर्णधारपदावरून विराटने पायउतार व्हावे, अशी मागणीही सोशल मीडियावर करण्यात आली. आजपासून चेन्नईत सुरू झालेल्या दुसऱया कसोटीत दमदार फलंदाजी करून टीकाकारांची तोंडे बंद करण्याची संधी विराटला होती. मात्र, इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीने त्याचा काटा काढला. क्रिकेटमध्ये धावांची टांकसाळ उघडणाऱ्या विराटला आज मात्र शून्यावर बाद व्हावे लागले. या अपयशासोबत विराटच्या यादीत नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
विराट 'या' कारणामुळे मोईन अलीला आयुष्यभर लक्षात ठेवेल! - विराट कोहली लेटेस्ट न्यूज
एखाद्या फिरकीपटूविरोधात विराट कोहली पहिल्यांदाच शून्य धावसंख्येवर बाद झाला आहे. तर १५० व्या डावांत ११ व्यांदा शून्य धावसंख्येवर विराट बाद झाला. भारतीय संघाच्या २२ षटकातील दुसऱ्या चेंडूवर विराट कोहली बाद झाला. मोईन अलीच्या अप्रतिम वळण घेतलेल्या चेंडूने विराटच्या बॅटचा बचाव भेदला. त्यामुळे मोईन अलीसाठी विराटचा हा बळी खास ठरला.

कसोटीत विराटला त्रिफळाचित करणारा मोईल अली केवळ दुसरा ऑफ स्पिनर ठरला आहे. यापुर्वी विराटला ग्रॅमी स्वॉनने २०१२मध्ये त्रिफळाचित केले होते. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, पॅट कमिन्स, बेन हिलफेनहॉस, मिशेल स्टार्क, सुरंगा लकमल, अबू जाएद, लियाम प्लंकेट, रवी रामपॉल आणि केमार रोच या इतर दहा गोलंदाजांनी विराटला शुन्यावर बाद केले आहे.
मागील ३१ डावांत विराटला एकही शतक झळकावता आलेले नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये विराटने अखेरचे शतक झळकावले होते.