ब्रिस्टोल - इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना सुरू असताना पावसाने हजेरी लावली. यामुळे सामना रद्द करण्यात आला. इंग्लंडने ही मालिका २-० ने जिंकली.
इंग्लंडने अखेरच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. तेव्हा श्रीलंकेचा डाव ४१.१ षटकात १६६ धावांवर आटोपला. त्यानंतर मैदानात पावसाने हजेरी लावली. नियोजित वेळेत उलटून गेली तरी देखील पाऊस थांबला नाही. तेव्हा पंचांनी सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.
इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ ढेपाळला. दासुन शनाका याने नाबाद ४८ धावा केल्या. यात २ चौकार आणि २ षटकारांचा समवेश आहे. शनाका वगळला वनिंदु हसरंगा (२०), ओशादा फर्नाडो (१८), दुश्मंता चमीरा (१६) आणि अविष्का फर्नांडो (१४) यांना दुहेरी आकडा गाठता आला. इंग्लंडकडून टॉम कुरेन याने चार गडी बाद केले. तर ख्रिस वोक्स आणि डेविड विली यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतली. आदिल रशिदने एक गडी बाद केला. विली मालिकावीर ठरला.
हेही वाचा -IPL मध्ये २ नवीन संघ येणार; मेगा ऑक्शन 'या' महिन्यात होणार
हेही वाचा -टी-२० मध्ये भारतीय क्रिकेटपटूचे तुफानी द्विशतक, १७ चेंडूत चोपल्या १०२ धावा