लंडन - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान एकदिवसीय मालिकेला सुरूवात होण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशात इंग्लंडच्या तीन खेळाडूंसह ताफ्यातील एकूण सात जणांना कोरोनाची लागण झाली. यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला संपूर्ण संघच बदलावा लागला.
पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. ८ जुलैपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. पण त्याआधी इंग्लंडच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. याशिवाय स्टाफ मेंबरमधील चार जण कोरोनाबाधित आढळले.
इंग्लंड बोर्डाने ही घटना घडल्यानंतर त्या कोरोनाबाधित खेळाडूंचे नाव जाहीर केले नाही. परंतु त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी बेन स्टोक्स संघाचे नेतृत्व करणार, असे जाहीर केले होते. त्यानंतर काही तासात इंग्लंडने आपला १८ सदस्यीय संघ जाहीर केला. यात ९ खेळाडू अनकॅप्ड म्हणजे नविन आहेत. त्यांनी अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.
दरम्यान, या घटनेमुळे नविन खेळाडूंना संधी मिळाली. या खेळाडूंना अशी अचानक संधी मिळेल, असे कोणाच्याही ध्यानीमनी देखील नव्हते. आता संघात स्थान मिळाल्याने, त्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची नामी संधी मिळाली आहे.
असा आहे इंग्लंडचा नवा संघ -