एजबॅस्टन (बर्मिंगहॅम):इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने राष्ट्रकुल क्रीडा 2022 ( Commonwealth Games 2022 ) च्या टी-20 स्पर्धेतील ब गटातील सामन्यात सात गडी राखून मोठा विजय नोंदवला. इंग्लंडची अनुभवी वेगवान गोलंदाज कॅथरीन ब्रंट ( Fast bowler Catherine Brunt ) आणि तरुण इसी वँग यांनी शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यामुळे यजमान संघाने न्यूझीलंडची फलंदाजी उद्ध्वस्त केली आणि विजय मिळवला. यासह, राष्ट्रकुल 2022 च्या उपांत्य फेरीतील चार संघ निश्चित झाले आहेत.
भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे उपांत्य फेरीतील चार संघ आहेत. हे सर्व संघ आपापल्या गटात टॉप-2 मध्ये आहेत. भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीच पक्के केले आहे. आता त्याचा उपांत्य सामना इंग्लंडविरुद्ध होणार ( England set Semifinal Clash with india ) आहे. भारतीय संघ अ गटात दुसऱ्या स्थानावर राहिला. तर इंग्लंडने त्यांच्या गट-ब मध्ये अव्वल स्थानावर राहून पात्रता मिळवली आहे. दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
सेमी-फायनलचे वेळापत्रक -
6 ऑगस्ट
पहिली उपांत्य फेरी - भारत विरुद्ध इंग्लंड - दुपारी 3:30 वा.