एजबॅस्टन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ( India vs England 5th Test Match ) ऋषभ पंतच्या 146 धावांनी क्रिकेट जगताला प्रभावित केले, त्यात मायकेल वॉन, वेस्ट इंडिजचा महान खेळाडू इयान बिशप आणि सचिन तेंडुलकर यांचाही समावेश होता.
भारतीय संघाची परिस्थिती कठीण असतानाही पंतने शानदार शतक झळकावत ( Rishabh Pant century ) संघाला कठीण प्रसंगातून बाहेर काढले. पंतने एजबॅस्टन येथे पहिल्या दिवशी 111 चेंडूत 146 धावांची शानदार खेळी खेळली. यासह रवींद्र जडेजाने नाबाद 83 धावांची खेळी केली. पंतच्या फलंदाजीपूर्वी संघाच्या पाच गडी गमावून 98 धावा झाल्या होत्या, तिथे पंत आणि जडेजा यांच्यात सहाव्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी झाली.
पंतची खेळी पाहून अनेक वर्तमान आणि माजी क्रिकेटपटूंनी या तरुणाचे कौतुक केले. सचिन तेंडुलकरने पंतचे काही उत्कृष्ट शॉट्स खेळतानाचे फोटो पोस्ट केले आणि लिहिले, अप्रतिम. पंतने चांगली खेळी केली. स्ट्राईक चांगली हलवली आणि अप्रतिम फटके खेळले.
भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ट्विट केले आहे की, दबावाखाली कसोटी सामन्यातील फलंदाजीचे विशेष प्रदर्शन.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने ही आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी असल्याचे म्हटले आहे. प्रसादने ट्विट केले की, “ऋषभ पंतच्या शानदार खेळींपैकी एक.