हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India v West Indies) यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये 1000 वनडे सामने खेळण्याचा ऐतिहासिक टप्पा देखील भारतीय संघाने पार केला आहे. या सामन्यात विराट कोहलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Virat Kohli New Record : विराट कोहलीने रचला अजून एक विक्रम; मायदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला दुसराच खेळाडू - fastest score 5000 odi runs
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराटने आपल्या नावे अजून एका विक्रमाची (Virat Kohli new record) भर घातली आहे. तो मायदेशात वनडेत पाच हजार धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
virat kohli
भारत आणि वेस्ट इंडिज विरूद्धच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने अवघ्या ८ धावा केल्या. मात्र तरीही त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर (Virat Kohli new record) केला आहे. त्याने मायदेशात 5000 वनडे धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला (Kohli new record at home soil) आहे. या अगोदर हा विक्रम फक्त सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने 48.11 च्या सरासरीने भारतात 6976 धावा केल्या आहेत. आता या यादीत विराट कोहली देखील सामिल झाला आहे.