महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket world cup 2023 : ना धोनी, ना युवराज; कोणते आहेत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप-५ फलंदाज

Cricket world cup 2023 : क्रिकेट विश्वचषक सुरू होण्याची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसे हृदयाचे ठोकेही वाढत आहेत. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान षटकार आणि चौकारांचा पाऊस पाहायला मिळेल. आज आम्ही तुम्हाला या स्टोरीद्वारे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांची माहिती देणार आहोत.

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 8:36 AM IST

Etv Bharat
Etv Bharat

हैदराबाद Cricket world cup 2023 : टी २० क्रिकेटच्या आगमनापासून चाहत्यांना मॅचमध्ये चौकार आणि षटकारांचा आतिषबाजी पाहायला आवडते. सहसा जास्त षटकार मारणारे खेळाडू चाहत्यांमध्ये अधिक लोकप्रिय असतात. २०२३ चा विश्वचषक सुरु होण्याआधी आज आम्ही तुम्हाला अशा टॉप ५ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.

  1. ख्रिस गेल : वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल हा क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू आहे. गेलनं विश्वचषकात ४९ षटकार मारले आहेत. गेल जेव्हा षटकार मारायला लागतो तेव्हा गोलंदाजांची लय भरकटते. २००३ ते २०१९ पर्यंत गेलनं ३५ विश्वचषक सामने खेळले. यामध्ये त्यानं ३४ डावांमध्ये फलंदाजी केली आणि ९०.५३ च्या स्ट्राइक रेटनं १,१८६ धावा केल्या.
    ख्रिस गेल
  2. एबी डिव्हिलियर्स : दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्स विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारा दुसरा फलंदाज आहे. त्यानं वर्ल्डकपमध्ये ३७ षटकार लगावले आहेत. डिव्हिलियर्स हा ३६० डिग्री प्लेअर म्हणून ओळखला जायचा. २००७ ते २०१५ या कालावधीत त्यानं २३ विश्वचषक सामने खेळले, ज्यामध्ये त्याला २२ सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली. यामध्ये त्यानं ११७ च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटनं १,२०७ धावा केल्या आहेत.
    एबी डिव्हिलियर्स
  3. रिकी पाँटिंग : विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं ३१ षटकार मारले आहेत. पाँटिंगनं १९९६ ते २०११ पर्यंत एकूण पाच विश्वचषक खेळले. यात त्यानं ४६ सामन्यांच्या ४२ डावांमध्ये ७९.९५ च्या स्ट्राइक रेटनं १,७४३ धावा केल्या आहेत.
    रिकी पाँटिंग
  4. ब्रेंडन मॅक्युलम : न्यूझीलंडचा माजी फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलमनं विश्वचषक स्पर्धेत २९ षटकार ठोकले आहेत. त्यानं २००३ ते २०१५ या कालावधीत चार विश्वचषकांमध्ये भाग घेतला. यात त्यानं ३४ सामन्यांच्या २७ डावांमध्ये १२०.८४ च्या धावगतीनं ७४२ धावा केल्या.
    ब्रेंडन मॅक्युलम
  5. हर्शल गिब्स : दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हर्शल गिब्सनं विश्वचषकात २८ षटकार ठोकले आहेत. एकेकाळी गिब्सची जगातील सर्वात धोकादायक फलंदाजांमध्ये गणना केली जायची. त्यानं १९९९ ते २००७ दरम्यान २४ विश्वचषक सामने खेळले. यामध्ये त्यानं २३ डावांमध्ये ८७.३९ च्या स्ट्राइक रेटनं १,०६७ धावा केल्या.
    हर्शल गिब्स

ABOUT THE AUTHOR

...view details