महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : 'विश्वचषक'चा रणसंग्राम; 'या' पाच तरुण खेळाडूंवर असणार खास नजर - ICC Cricket World Cup 2023

Cricket World Cup २०२३ : 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक 2023 ची आतुरतेनं वाट पाहिली जात आहे. या विश्वचषकात काही खेळाडू अनुभवी असणार आहेत, तर काही युवा खेळाडूही विश्वचषकात आपली छाप सोडणार आहेत. जाणुन घेऊया विश्वचषकातील सर्वात 5 तरुण खेळाडूंबद्दल....

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 7:34 PM IST

हैदराबाद : Cricket World Cup २०२३ :आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 ची सुरुवात अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबरपासून होत आहे. गतविजेता इंग्लंडचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. क्रिकेट चाहत्यांसोबतच खेळाडूही सामना सुरू होण्याची वाट पाहत आहेत. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व संघ पूर्णपणे तयार आहेत. कोणत्याही खेळात तरुण खेळाडू अनेकदा नवीन ऊर्जा, उत्साहानं भरलेले असतात. अगदी कमी वयातच विश्वचषकासाठी निवडले जाणारे तरुण खेळाडू आहेत. आम्ही तुम्हाला आगामी विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या पाच सर्वात तरुण खेळाडूंबद्दल सांगणार आहोत.

  • नूर अहमद : सर्वात तरुण खेळाडूंमध्ये पहिलं नाव अफगाणिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमदचं आहे. त्याचं सध्याचं वय 18 वर्षे 253 दिवस आहे. 2023 मध्ये इंडियन प्रीमियर लीग चॅम्पियन गुजरात टायटन्सकडून खेळताना नूर अहमद प्रसिद्धीच्या झोतात आला होता. नूर जगभरातील क्रिकेट लीगमध्ये खेळतोय. नूरनं 3 वनडे, एक टी-20 मध्ये सहा विकेट्स घेतल्या आहेत. नूर, अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भाग घेणार आहेत. नूर आणि रशीद यांना आयपीएलमध्ये भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळं या दोघांची जोडी प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरू शकते. त्याच्या कामगिरीवर अफगाणिस्तानची नजर असेल.
  • आर्यन दत्त :आर्यन दत्त आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये खेळणारा दुसरा युवा वेगवान गोलंदाज खेळाडू आहे. नेदरलँड्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज आर्यनचं 20 वर्ष 118 दिवस आहे. त्यानं 2021 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आर्यननं 25 एकदिवसीय सामने आणि 5 टी-20 सामने खेळले आहेत. आर्यननं 25 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5.17 च्या इकॉनॉमी रेटने 20 बळी घेतले आहेत, तसंच 965 धावा दिल्या आहेत. वनडेत 31 धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
  • रियाझ हसन :आगामी विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंमध्ये अफगाणिस्तानचा रियाझ हसन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचं वय 20 वर्ष 310 दिवस आहे. रियाझ हा उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्यानं जानेवारी 2022 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. रियाझनं 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 30 च्या सरासरीनं 68 च्या स्ट्राइक रेटनं 120 धावा केल्या आहेत. त्यानं एकमेव अर्धशतक झळकावले आहे. विश्वचषकात रियाझ संघासाठी मोठी खेळी खेळेल, अशी अफगाणिस्तानला आशा आहे.
  • तंजीम हसन साकिब :बांगलादेशचा उजवा हाताचा वेगवान गोलंदाज तंजीम हसन हा आगामी आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये खेळणारा चौथा सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. त्याचं वय 20 वर्षे 341 दिवस आहे. शाकिबनं दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 57 धावा दिल्या आहेत आणि दोन विकेट्स घेतल्या आहेत. शाकिबनं श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
  • विक्रम जीत सिंग :20 वर्षे 342 दिवसांचा विक्रम जीत सिंग नेदरलँडचा उजवा हाताचा फलंदाज आहे. भारतीय वंशाच्या विक्रम जीत सिंगनं 25 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32.32 च्या सरासरीनं 808 धावा केल्या आहेत. त्यानं एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. विक्रम जीत सिंग यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. वयाच्या सातव्या वर्षी तो नेदरलँडमध्ये आपल्या पालकांसह कायमचा स्थायिक झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details