महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : रवींद्र जडेजाला बालपणी बनायचं होतं वेगवान गोलंदाज, कोच महेंद्रसिंह चौहान यांचा 'ईटीव्ही भारत' च्या खास मुलाखतीत खुलासा - Ravindra Jadeja childhood coach

Cricket World Cup 2023 : अष्टपैलू रवींद्र जडेजाचे बालपणीचे कोच महेंद्रसिंह चौहान यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सांगितलं की, विश्वचषकात फलंदाजी ही भारताची सर्वात मोठी ताकद असणार आहे. जडेजा बॅटनं महत्त्वाची भूमिका बजावेल. याशिवाय त्यांनी, जडेजाला बालपणी वेगवान गोलंदाज बनायचं होतं असा खुलासाही केला. वाचा ही खास मुलाखत..

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 12:39 PM IST

Updated : Oct 1, 2023, 1:38 PM IST

अहमदाबाद Cricket World Cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या विश्वचषकासाठी सर्व संघांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर नेहमीप्रमाणे फिरकीपटूंची भूमिका महत्वाची असेल. रविंद्र जडेजा हा भारताचा प्रमुख फिरकीपटू आहे. मात्र त्याच्यावर गोलंदाजीसह फलंदाजीचीही अतिरिक्त जबाबदारी असेल. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर रविंद्र जडेजाचे बालपणीचे कोच महेंद्रसिंह चौहान यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत खास बातचीत केली. यावेळी बोलताना त्यांनी भारताच्या विश्वचषक जिंकण्याच्या शक्यतांवर आपलं मत मांडलं.

जडेजा स्लॉग ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करू शकतो : महेंद्रसिंह चौहान म्हणाले की, 'भारताकडे रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि हार्दिक पांड्यासारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. हे तिघही स्लॉग ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करू शकतात. त्यांच्यामुळे भारताची फलंदाजी मजबूत होते'. ते पुढे म्हणाले की, 'भारताव्यतिरिक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन टीम विश्वचषक जिंकण्याच्या प्रबळ दावेदार आहेत. भारत फेव्हरेट आहे. आगामी विश्वचषकासाठी मी टीम इंडियाला शुभेच्छा देतो. मात्र, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियालाही ट्रॉफी जिंकण्याची चांगली संधी आहे. त्याचबरोबर पाकिस्तानची टीमही मजबूत आहे', असं ते म्हणाले.

रवींद्र जडेजाचे बालपणीचे कोच महेंद्रसिंह चौहान

सुरुवातीला वेगवान गोलंदाज बनायचं होतं : पुढे बोलताना चौहान यांनी जडेजाच्या सुरवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं. 'मी त्याला (रवींद्र जडेजा) आठ वर्षांचा असताना भेटलो. तो त्याच्या आई-वडिलांसोबत आला होता. तेव्हाच मला क्रिकेटमधील त्याची आवड दिसून आली. सुरुवातीला त्याला वेगवान गोलंदाज बनायचं होतं. त्यानंतर त्यानं फिरकी गोलंदाजी आणि फलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं. त्याच्या कमी उंचीसाठी हे योग्यही होतं. हा निर्णय त्याच्यासाठी फलदायी ठरला. आता तो जगभरातील आघाडीच्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे, असं ते म्हणाले.

रविंद्र जडेजा कोच महेंद्रसिंह चौहान यांच्यासोबत

मैदानावरील चपळता इतरांपेक्षा वेगळं बनवते : रवींद्र जडेजाच्या खेळाविषयी आपलं मत व्यक्त करताना ते म्हणाले की, त्याची मैदानावरील चपळता त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते. 'मैदानावरील त्याच्या चपळतेमुळे तो टीम इंडियाचा स्टार खेळाडू बनला आहे. त्यानं बॅटनं भारतासाठी अनेक वेळा सामने जिंकले आहेत. तसेच त्याच्या वेगामुळे अनेकदा स्ट्राइक रोटेट होण्यास मदत होते. याशिवाय त्यानं स्लॉग ओव्हर्समध्येही फटकेबाजीचं उत्कृष्ट कौशल्य दाखवलंय', असं त्यांनी नमूद केलं.

जडेजा ज्या पद्धतीनं खेळतोय, त्याला आता सल्ल्याची गरज नाही. मात्र विश्वचषक जिंकला पाहिजे. 'रवींद्रला कोणताही सल्ला देण्याची गरज नाही. त्यानं विश्वचषक जिंकावा एवढीच माझी इच्छा आहे. मी त्याच्याशी फोनवर बोलत राहतो. तेव्हा तो इथल्या स्थानिक क्रिकेटपटूंबद्दल विचारत असतो - कोच महेंद्रसिंह चौहान

रवींद्र जडेजाचे बालपणीचे कोच महेंद्रसिंह चौहान

पटापट षटकं टाकण्याची शैली चांगली : ते पुढे बोलताना म्हणाले की, 'मी टीव्हीवर त्याचे सामने पाहत नाही. पण मला त्याच्या कामगिरीबद्दल लोकांकडून माहिती मिळते. जेव्हा जेव्हा मी ऐकतो की त्यानं निराशाजनक कामगिरी केली, तेव्हा मी अस्वस्थ होतो. तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. तसेच मी त्याच्या गोलंदाजीमध्ये सुधारणा पाहिली आहे. त्याची पटापट षटकं टाकण्याची शैली संघासाठी खूप चांगलं काम करते', असं ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावे आहेत सर्वाधिक धावा, जाणून घ्या कोण आहेत अव्वल पाच फलंदाज
  2. Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानचे पाच मॅचविनर खेळाडू 'या' विश्वचषकात करू शकतात दमदार कामगिरी
  3. Cricket World Cup 2023 : बांग्लादेशच्या 'या' ५ खेळाडूंना अजिबात हलक्यात घेऊ नका, जाणून घ्या कोण आहेत हे खेळाडू
Last Updated : Oct 1, 2023, 1:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details