चेन्नई Cricket World Cup 2023 :भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्यासाठी येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर संघाचा सराव सुरू आहे. बुधवारपासून 'चेपॉक' स्टेडियमवर हा सराव सुरू आहे. चेन्नईतील वेलाचेरी येथे राहणारा 19 वर्षीय श्रीनिवास विराट कोहलीचा कट्टर चाहता आहे. श्रीनिवासला चालता येत नाही. श्रीनिवासनं आज चेपॉक स्टेडियमवर विराट कोहलीची पेंटिंग देऊन भेट घेतली.
दिव्यांग श्रीनिवासला कोहली भेटला : श्रीनिवास म्हणाला, 'मी वयाच्या 12 व्या वर्षापासून क्रिकेट पाहतोय. मला क्रिकेटमध्ये विशेष रुची आहे. मी विराट कोहलीला पाहण्यासाठी दोन वर्षे वाट पाहात होतो. अखेर आज माझं स्वप्न पूर्ण झालंय. मी विराट कोहलीला भेटायला आलो होतो. मी या आगोदर देखील कर्नाटकात बंगळुरूला गेलो होतो. तिथं मला विराट कोहलीला भेटण्याची संधी मिळाली नाही, पण आज अनपेक्षितपणे मला विराट कोहलीला भेटण्याची संधी मिळाली.
पेंटिंग दाखवताना मला खूप आनंद :तो पुढे म्हणाला, 'विराटला माझी पेंटिंग दाखवताना मला खूप आनंद झाला. मला बघून तो लगेच आला. आल्यानंतर मी विराट कोहलीला ऑटोग्राफ देण्याची विनंती केली. तसंच मी त्याला माझ्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. त्यानंही लगेच कोणाताही विचार न करता माझ्यासोबत एक फोटो काढला. मी सध्या महेंद्रसिंह धोनीचं स्केच बनवत आहे. हे स्केच लवकरच मी त्यांना भेट देणार असल्याचं श्रीनिवास म्हणाला.
कोहलीच्या पोर्ट्रेटसाठी 40 तास काम : श्रीनिवासनं सांगितलं की, स्टार फलंदाज, माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीचं पोर्ट्रेट तयार करण्यासाठी त्यानं रंगीत पेन्सिलनं 40 तास काम केलं. 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेटचा भाग असलेल्या कोहलीच्या नावावर अनेक विक्रम आहेत.
हेही वाचा -
- ICC Cricket World Cup 2023 PAK vs NED : नेदरलँडचा पाकिस्तानला दणका, झटपट ३ गडी बाद, वाचा स्कोर
- Asian Game 2023 : उपांत्य सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचं विजयी 'तिलक', अंतिम फेरीत प्रवेश करत केलं पदक निश्चित
- Rachin Ravindra : विश्वविजेत्या संघाला आपल्या अष्टपैलू कामगिरीनं नाचवणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण, घ्या जाणून