अहमदाबाद Cricket World Cup 2023 : न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रनं आयसीसी विश्वचषक २०२३ च्या सलामीच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी आपलं सर्वोतुमुखी केलं. विश्वचषक 2023 च्या पहिल्याच सामन्यात रवींद्रनं शानदार शतक झळकावलं. त्याच्या विश्वचषक कारकिर्दीतील हा पहिलाच सामना होता आणि त्यानं यात शानदार कामगिरी करत आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात त्यानं 123 धावांची नाबाद खेळी केली. यावेळी त्यानं डेव्हन कॉन्वेच्या साथीनं न्यूझीलंडला 9 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवून दिला.
रवींद्रचं रचिन हे नाव कसं पडलं :रचिन रवींद्र हे नाव ठेवण्यामागं एक रंजक कथा आहे. खरं तर त्याच्या वडिलांची इच्छा होती की राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या खेळाचं मिश्रण त्याच्यात असावं, सचिन आणि राहुलचे गुणही असावेत. म्हणून त्याच्या वडिलांनी राहूलचा 'र' आणि सचिनचा 'चिन' एकत्र करत त्यांनी त्याचं नाव रचिन ठेवलं. रचिन हा भारतीय वंशाचा किवी खेळाडू आहे. या डावखुऱ्या खेळाडूचा जन्म वेलिंग्टन इथं झाला. त्याचे आई-वडील कर्नाटकातील बंगळुरूचे रहिवासी आहेत आणि ते सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. रचिनचे आई-वडील न्यूझीलंडमध्ये स्थलांतरित झाले. रचिन त्याचे आई-वडील न्यूझीलंडला जाण्यापूर्वी त्याच्या मूळ गावी बंगळुरूमध्ये क्लबस्तरीय क्रिकेट खेळत होता.