लंडन - सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून विराट कोहलीला नावाजले जाते. अनेक तरुण खेळाडूंचे तो प्रेरणास्थान आहे. आजी - माजी असे सर्व दिग्गज खेळाडू विराटचे तोंड भरुन कौतुक करत असतात. वेस्ट इंडिजचे सार्वकालिन महान फलंदाज व्हिव्ह रिचर्ड्स यांनाही विराटचे कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही.
विराटला पाहिल्यावर वेस्ट इंडिजच्या 'या' महान फलंदाजाला आठवतो स्वत:चा भूतकाळ - london
आजी-माजी असे सर्व दिग्गज खेळाडू विराटचे तोंड भरुन कौतुक करत असतात. वेस्ट इंडिजचे सार्वकालिन महान फलंदाज व्हिव्ह रिचर्ड्स यांनाही विराटचे कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही.
व्हिव्ह रिचर्ड्स यांना असे वाटते की, त्यांच्याकडे जी खेळाबद्दल मानसिकता होती तीच विराटकडे आहे. मला नेहमीच भारतीय फलंदाज आवडतात. विराटकडे जो आत्मविश्वास आहे तो एका रात्रीत आलेला नाही. कदाचित तो जन्मत: त्याच्याकडे असेल. त्याच्याकडे असणारा आक्रमकपणा म्हणजे स्वत:च्या घरची चावी स्वत:कडे असण्यासारखे आहे. त्यामुळे विराटची फलंदाजी आणि मैदानावरची आक्रमक वृत्ती पाहिल्यावर मला माझी आठवण येते असेही रिचर्ड्स सांगतात.
विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला सरावादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे भारताच्या सलामीच्या सामन्या विराट खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट हा पूर्णपणे फिट असून तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.