मँचेस्टर - विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाचा १२५ धावांनी पराभव करत विजयी मालिका कायम ठेवली आहे. भारतीय संघाचे २६९ धावांचे आव्हान वेस्ट इंडिज संघाला पेलवले नाही. विंडीजचा संपूर्ण संघ १४३ धावांवर गारद झाला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलेल्या ७२ धावांच्या महत्वपूर्ण खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारासोबत त्याने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
विराटचा हा वनडे क्रिकेटमधील 33 वा सामनावीर पुरस्कार ठरला आहे. असे करताना त्याने जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग आणि शाहिद आफ्रिदीला मागे टाकले आहे. या सर्वांनी ३२ वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता. विराट आता वनडेमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकात ७ बाद २६८ धावांवर मजल मारली. यात विराट कोहली (७२) महेंद्रसिंह धोनी (५६), या दोघांची अर्धशतकी खेळी आणि लोकेश राहूल (४८), हार्दिक पांड्या (४६) यांच्या मदतीने विंडीजसमोर २६८ धावांचे आव्हान ठेवले होते.
वनडेमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारे खेळाडू-