नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. जगभरात त्याचे प्रचंड चाहते आहेत. विराटने क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम गाठले आहेत. असाच अजून एक विक्रम त्याने ट्विटरवर केला आहे.
विराटने मास्टर ब्लास्टर मागे टाकले..ट्विटरवर गाठला 'इतक्या' फॉलोअर्सचा पल्ला - twitter followers
विराटने क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम गाठले आहेत. असाच अजून एक विक्रम त्याने ट्विटरवर केला आहे.
विराट कोहलीने ट्विटरवर ३ कोटी फॉलोअर्सचा पल्ला गाठला आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. हा पल्ला गाठल्यानंतर विराटने चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'प्रेम आणि पाठिंब्याबद्दल तुम्हाल सर्वांचे आभार..#30MillionStrong' असे विराटने ट्विट करुन म्हटले आहे.
याशिवाय विराटने ३ कोटी फॉलोअर्सबाबत त्याच्या प्रतिक्रियेचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात धोनीने षटकार मारल्यानंतर कोहलीने जे हावभाव केले होते त्याचा उपयोग विराटने आपल्या प्रतिक्रियेत केला आहे.