नवी दिल्ली - पहिल्या सराव सामन्यात पराभवाची चव चाखल्यानंतर बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱया सराव सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. के. एल. राहुलने केलेल्या खेळीमुळे भारतीय संघातील चौथ्या स्थानाचा प्रश्न सुटला आहे. तसेच, फॉर्मात आलेल्या धोनीमुळे टीम इंडियाच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
WC 2019 : चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला, माहीने केली कमाल
के. एल. राहुलने केलेल्या खेळीमुळे भारतीय संघातील चौथ्या स्थानाचा प्रश्न सुटला आहे. तसेच, फॉर्मात आलेल्या धोनीमुळे टीम इंडियाच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धोनीचा जलवा
कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताने ३५९ धावांचा डोंगर उभा केला होता. लोकेश राहुलने १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०८ धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या धोनीने ११३ धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली.
तब्बल दोन वर्षांपूर्वी लगावले होते शतक
दोन वर्षांपूर्वी कटकमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात धोनीने शतकी खेळी केली होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे १० हजारांपेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडलेल्या धोनीने आपल्या करियरमध्ये फक्त १० शतके लगावली आहेत. त्यानेबांगलादेशविरुद्ध केलेल्या खेळीमध्ये ७ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता.