लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत यजमान इंग्लडचा ऑस्ट्रेलियाने ६४ धावांनी पराभव केला. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर दमदार विजय मिळवला. इंग्लडकडून बेन स्टोक्सने एकाकी झुंज देत ८९ धावांची खेळी केली. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने एक अफलातून यॉर्कर टाकत स्टोक्सचा त्रिफळा उडवला.
VIDEO : मिचेल स्टार्कचा हा अफलातून 'यॉर्कर' पाहून बुमराही होईल थक्क ! - yorker
वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने एक अफलातून यॉर्कर टाकत स्टोक्सचा त्रिफळा उडवला.
इग्लंडंचा संघ फलंदाजी करत असताना ३७ व्या षटकात स्टोक्स बाद झाला. मिचेल स्टार्कने यॉर्कर टाकून त्रिफळा उडवल्यानंतर स्टोक्सनेही हातातील बॅट सोडली. स्टार्कचा हा यॉर्कर यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट यॉर्कर होता, आणि हा यॉर्कर पाहून बुमराही थक्क होईल अशी चर्चा सोशल मीडियावर रंगते आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लडसमोर २८५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग इंग्लंडला करता आला नाही. इंग्लंडचा संघ ४४.४ षटकात २२१ धावांवर सर्वबाद झाला.