महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

#HappyBirthdayDada : 'ती' एक चूक जी दादाला अजूनही सलते.. - ग्रेग चॅपेल

२००४ मध्ये गांगुलीने घेतलेला एक निर्णय त्याच्याच अंगउलट आला. भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून ग्रेग चॅपेल यांची नियुक्ती झाली.

#HappyBirthdayDada : 'ती' एक चूक जी दादाला अजूनही सलते..

By

Published : Jul 8, 2019, 12:02 PM IST

नवी दिल्ली -क्रिकेटच्या मैदानावर 'दादा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीचा आज ४७ वा वाढदिवस आहे. जगभरातून अनेक चाहते गांगुलीला शुभेच्छा देत आहेत. गांगुली हा भारतीय क्रिकेटला यशस्वी दिशा देणारा कर्णधार मानला जातो. युवराज सिंग, इरफान पठाण, हरभजन सिंग, महेंद्रसिंह धोनी या यशस्वी खेळाडूंची जडणघडण गांगुलीच्या आखाड्यात झाली. भारतीय क्रिकेटला उंचीवर पोहोचवणाऱ्या गांगुलीला मात्र एक चूक नेहमी सलते. आणि तो या चुकीला त्याच्या जीवनातील सर्वात मोठी चूक मानतो.

२००४ मध्ये गांगुलीने घेतलेला एक निर्णय त्याच्याच अंगउलट आला. भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून ग्रेग चॅपेल यांची नियुक्ती झाली. ही नियुक्ती करण्यामागे गांगुलीनेच दबाव टाकला होता. गांगुलीने आपल्या 'अ सेंचुरी इज नॉट इनफ' या पुस्तकात म्हटले आहे, 'मला वाटले की चॅपेल आम्हाला संकटकालीन परिस्थितीत अव्वल करण्यासाठी योग्य व्यक्ती आहेत. मी जगमोहन दालमिया यांना माझी आवड पाठवली होती. अनेकजण मला ही नियुक्ती बदलण्यास सांगत होते. त्यात सुनील गावसकर यांनीही मला फेरविचार करण्यास सांगितले होते.'

ग्रेग चॅपेल

गांगुलीने मात्र कोणाचे ऐकले नाही. आणि चॅपेल यांची नियुक्ती झाली. त्यांच्या काळात भारतीय संघात तर फूट पडलीच. शिवाय, गांगुलीचे कर्णधारपदही गेले. गांगुलीचा हा निर्णय त्याला स्वत:ला आयुष्यातील मोठी चूक वाटते. चॅपेल भारताशी जोडले गेले नसते तर, कदाचित दादाचे करियर मोठे झाले असले.

ABOUT THE AUTHOR

...view details