महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टीम इंडियाचे ट्रेनर म्हणतात, 'या' कारणामुळेच शिखर धवन विश्वचषकाबाहेर! - shankar basu

बीसीसीआयने यापूर्वीच धवनचा बॅकअप खेळाडू म्हणून ऋषभ पंतला इंग्लंडला बोलावून घेतले आहे. त्यामुळे धवनच्या जागेवर आता पंतची भारतीय संघात वर्णी लागणार आहे.

शंकर बसू

By

Published : Jun 19, 2019, 7:54 PM IST

नवी दिल्ली -भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे धवनला स्पर्धेबाहेर जावे लागले असले तरी टीम इंडियाचे ट्रेनर शंकर बसू यांनी त्याच्या स्पर्धेबाहेर जाण्याचे खरे कारण सांगितले आहे.

टीम इंडियाचे ट्रेनर शंकर बसूंनी धवनच्या दुखापतीचे कारण सांगितले आहे.

'आयपीएल स्पर्धेच्या वेळेस खेळाडू मध्यरात्री २-३ वाजता झोपतात. त्यानंतर सकाळी पुन्हा वेळेत सराव सत्रात हजर रहाणे हे अत्यंत कठीण असते. त्यावेळी सर्व खेळाडूंना चांगल्या झोपेचे आणि वेळेवर उठण्याचे, चांगला आहार व प्रशिक्षणाचे महत्व कळते.' असे शंकर बसू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

धवन विश्वकरंडक स्पर्धेसाठी फिट नसून त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याने तो माघार घेत असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली होती. त्यानंतर, बीसीसीआयने यापूर्वीच धवनचा बॅकअप खेळाडू म्हणून ऋषभ पंतला इंग्लंडला बोलावून घेतले आहे. त्यामुळे धवनच्या जागेवर आता पंतची भारतीय संघात वर्णी लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details