लंडन -आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी फलंदाज शॉन मार्श दुखापतीमुळे संघाबाहेर पडला आहे.
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! 'हा' दिग्गज खेळाडू झाला स्पर्धेबाहेर...जाणून घ्या कारण - australia
शॉन मार्शच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज पिटर हँड्सकॉम्बला संघात स्थान देण्यात आले आहे.
नेटमध्ये सराव करत असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा चेंडू मार्शच्या उजव्या हाताला लागला. त्यानंतर मार्शला लगेच उपचाराला पाठवण्यात आले. तेव्हा त्याला फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले आहे.
शॉन मार्शच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज पिटर हँड्सकॉम्बला संघात स्थान देण्यात आले आहे. शॉनच्या दुखापतीवर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ‘शॉनसाठी आणि संघासाठी ही धक्कादायक बातमी आहे. या स्पर्धेदरम्यान, त्याचा आत्मविश्वास चांगला होता. त्याच्या फ्रॅक्चर झालेल्या हाताला शस्त्रक्रियेची गरज आहे.’