मँचेस्टर - विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाचा १२५ धावांनी पराभव करत विजयी मालिका कायम ठेवली. भारतीय संघाचे २६९ धावांचे आव्हान वेस्ट इंडिज संघाला पेलवले नाही. विंडीजचा संपूर्ण संघ १४३ धावांवर गारद झाला. या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजीचे वर्चस्व पाहायला मिळाले असले तरी, फलंदाजीत मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात भारताला अपयश आले. अफगाणिस्तानविरुद्ध संथ खेळी केल्याची टीका सचिनने केली होती. आता भारताचा माजी सलामीवीर विरेंदर सेहवागनेही भारतीय फलंदाजीबाबत ताशेरे ओढले आहेत.
'फिरकी'ला एवढे का घाबरता..? सेहवागच्या भारतीय फलंदाजांना कानपिचक्या
या अगोदर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात धोनीने संथ खेळी केल्याचे मत मांडले होते.
सेहवाग
भारतीय फलंदाजांनी अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज संघाच्या फिरकीपटूंसमोर बचावात्मक खेळी का केली असा प्रश्न सेहवागने केला आहे. त्याने राशिद खान आणि फॅबिअन एलन या फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाजांनी केलेल्या धावा सांगितल्या आहेत.
या अगोदर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात धोनीने संथ खेळी केल्याचे मत मांडले होते. त्यावरुन सोशल मिडियावर धोनी आणि सचिनच्या चाहत्यांचा वाद उफाळून आला होता.