मँचेस्टर - विश्वकरंडक स्पर्धेतील आजच्या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलब्दिन नैब आणि दौलत झादरान यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले असले तरी अफगाणिस्तानची गोलंदाजी आज सपशेल कोलमडली. अशातच, फिरकीपटू राशिद खानच्या नावे एका भलत्याच विक्रमाची नोंद झाली आहे.
CRICKET WC : राशिद खानची इतिहासात नोंद..पण नको त्या कामगिरीसाठी - highest economy
अफगाणिस्तानचा कर्णधार गुलब्दिन नैब आणि दौलत झादरान यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात राशिद खान सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. आज टाकलेल्या ९ षटकांमध्ये राशिदला ११० धावा पडल्या आहेत. एखाद्या फिरकीपटूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शंभरपेक्षा जास्त धावा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिवाय, त्याला आजच्या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळे राशिदची नको त्या कामगिरीसाठी इतिहासात नोंद झाली आहे.
तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन, जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने ६ गड्यांच्या मोबदल्यात ३९७ धावांचा डोंगर उभा केला.