महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धोनी आणि पांड्याने एकसाथ लगावला 'हेलिकॉप्टर' शॉट!..पाहा व्हिडिओ - 38 bday

धोनीच्या वाढदिवसाला हार्दिक पांड्या, ऋषभ पंत आणि इतर खेळाडू उपस्थित होते

धोनी आणि पांड्याने एकसाथ लगावला 'हेलिकॉप्टर' शॉट!..पाहा व्हिडिओ

By

Published : Jul 7, 2019, 1:47 PM IST

लंडन - टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा आज ३८ वा वाढदिवस. आयसीसीच्या तीनही ट्रॉफींचा हकदार असलेल्या धोनीला आज वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत. टीम इंडियाच्या खेळांडूंनीही धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानेही धोनीसोबत 'हेलिकॉप्टर' शॉट लगावत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

धोनी आणि संघकारी खेळाडू विश्वकरंडक स्पर्धेत व्यस्त आहेत. त्यामुळे धोनीच्या वाढदिवसाला हार्दिक पांड्या, ऋषभ पंत आणि इतर खेळाडू उपस्थित होते. मुलगी झिवासह धोनीने केक कापल्यानंतर हार्दिकने धोनीला सोबत घेत 'हेलिकॉप्टर' शॉट मारण्याची कृती केली. आणि धोनीला शुभेच्छा दिल्या.

धोनीसाठी ही विश्वकरंडक स्पर्धा सोपी गेली नाही. त्याला अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरीही करता आली नाही. त्यामुळे उरलेल्या दोन सामन्यात तो कसा खेळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोबतच त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी क्रिकेटविश्वात उधाण आले आहे. त्यामुळे भारताने यंदाचा विश्वकप उंचावला तर माहीसाठी ती अजून एक गोड आठवण ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details