लंडन -आयसीसीची कोणताही स्पर्धा म्हटली की सर्वांना उत्सुकता असते ती भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या द्वंद्वाची. इतर विश्वकपप्रमाणेच सध्याच्या विश्वचषकातही सर्वांच्याच नजरा भारत - पाक सामन्यावर आणि सामन्यापूर्वी होणाऱ्या मजेशीर जाहिरातीवर लागल्या आहेत. १६ जूनला होणाऱ्या या सामन्यापूर्वी अशीच एक जाहिरात पाकिस्तानमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.
CRICKET WORLD CUP : भारत-पाक सामन्यापूर्वीच पाकिस्तानची 'ही' जाहिरात चर्चेत
आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सहावेळा आमनेसामने आले आहेत.
या व्हिडीओमध्ये बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानच्या हवाई दलासोबत झालेल्या चकमकीदरम्यान पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांचा वापर करण्यात आला आहे. 27 फेब्रुवारीला अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या व्हिडीओचा आशय घेऊन ही जाहिरात तयार केली आहे.
आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सहावेळा आमनेसामने आले आहेत. मात्र एकाही सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही.