नवी दिल्ली -पाकिस्तानचे पंतप्रधान आणि दिग्गज खेळाडू इम्रान खान यांनी पाकिस्तान संघाला सुधारण्याचा विडा उचलला आहे. 'माझे शब्द लक्षात ठेवा, पुढील विश्वचषकापर्यंत मी पाकिस्तानला सर्वोत्तम संघ बनवून दाखवतो' असे त्यांनी म्हटले आहे.
'माझे शब्द लक्षात ठेवा, मी पाकिस्तानला सर्वोत्तम संघ बनवून दाखवतो' - exit
पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान संघाला सुधारण्याचा विडा उचलला आहे.
पंतप्रधान इम्रान खान सध्या तीनदिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मूळ पाकिस्तानी असणाऱ्या पण, सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, 'यंदाच्या विश्वचषकानंतर मी पाकिस्तानच्या संघामध्ये सुधार करणार आहे. खूप निराशा झाली आहे, पण आगामी विश्वचषकात तुम्ही पाकिस्तानच्या चांगल्या संघाला पाहाल. यासाठी यंत्रणेत काही बदल करावे लागतील आणि नवीन खेळाडूंनाही संधी द्यावी लागेल.'
आपल्या नेतृत्वाखाली इम्रान खान यांनी 1992 मध्ये विश्वकरंडक उंचावला होता. त्यानंतर पाकिस्तानला एकदाही विश्वकरंडक उंचावता आलेला नाही. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत कर्णधार सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला पाचव्या क्रमांकावर राहावे लागले होते.