कोलंबो - श्रीलंकेचा यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून ख्याती असेलेला लसिथ मलिंगा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर मलिंगा निवृत्त होणार असल्याची माहिती कर्णधार दिमुख करुणरत्नेने दिली होती. मलिंगापाठोपाठ श्रीलंकेला आता अजून एक धक्का बसला आहे.
ज्या गोलंदाजाच्या चेंडूवर धोनीने षटकार मारुन विश्वकरंडक जिंकवला तो गोलंदाज निवृत्त!
लंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या गोलंदाजाच्या चेंडूवर धोनीने षटकार मारुन विश्वकरंडक जिंकवला तो गोलंदाज निवृत्त!
लंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कुलसेकराने याआधी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठले होते. 37 वर्षीय कुलसेकराने 21 कसोटी, 184 वन डे आणि 58 टी-ट्वेंटी-20 सामन्यांत श्रीलंकेच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 48, वन डेत 199 आणि टी-20मध्ये 66 विकेट्स आहेत.