माले - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २ दिवसीय विदेश दौऱ्यावर असून शनिवारी त्यांनी मालदीवला भेट दिली. मोदींनी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सालेह यांना खास बॅट दिली आहे. दोन्ही देशांतील खेळाचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी मोदींनी ही शक्कल लढवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीही विश्वकपच्या प्रेमात, मालदीवच्या राष्ट्रपतींना दिली खास बॅट - pm modi
मोहम्मद सालेह हे आयपीएलच्या एका सामन्याला हजर राहिले होते.
मोदींनी मालदीवचे राष्ट्रपती यांना खास बॅट दिली आहे
या बॅटवर २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळणाऱ्या भारताच्या सर्व खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आहेत. मोदी म्हणाले, " माझे मित्र सालेह यांना क्रिकेटची खूप आवड आहे, म्हणूनच मी त्यांना २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंची स्वाक्षरी असलेली बॅट देत आहे."
मोहम्मद सालेह हे आयपीएलच्या एका सामन्याला हजर राहिले होते. तेव्हा त्यांनी मालदीवमध्ये एक क्रिकेटचा संघ असावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.