बर्मिंगहॅम -आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लडने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथमच भगव्या जर्सीचा वापर केला. सोशल मीडियावर भारताच्या पराभवाचे खापर या जर्सीवर फोडले जात आहे. आणि आता जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही या जर्सीला दोष दिला आहे.
'भगव्या जर्सीमुळेच भारतीय क्रिकेट संघ हरला'
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही या जर्सीला दोष दिला आहे.
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही या जर्सीला दोष दिला आहे.
मुफ्ती म्हणाल्या, 'मला अंधश्रद्धाळू म्हटले तरी चालेल पण या जर्सीमुळे भारताच्या विजयाची मालिका खंडित झाली.' मुफ्ती यांनी ट्विटरवर हे विधान केले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्याअगोदर नेटकऱ्यांनी या जर्सीला बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स, संत्री, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, स्विगी यासंर्वांची उपमा दिली होती. एका फोटोमध्ये तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सारख्या दिसणाऱ्या माणसाशी या जर्सीचा संबंध जोडला होता.