महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Video मार्टिन गुप्टीलच्या 'त्या' फेकीने भारतावर जणू 'बॉम्ब'च पडला - महेंद्रसिंह धोनी

भुवनेश्वरकुमार सोबत दुहेरी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या धोनीला मार्टिन गुप्टीलने धावबाद केले. गुप्टीलच्या त्या फेकीने भारतावर जणू 'बॉम्ब'च पडला...

मँचेस्टर

By

Published : Jul 11, 2019, 10:21 AM IST

मँचेस्टर - महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा मैदानात असल्याने भारताच्या चाहत्यांच्या आशा कायम होत्या. सेमीफायनल सारख्या महत्त्वाच्या सामन्यात आणि एकिकडे संघाची पडझड सुरू असताना चिवट फलंदाजी करणारा रवींद्र जडेजा (७७ धावा) बाद झाला.. त्यामुळे आता उरली-सुरली मदार अनुभवी धोनीच्या हातात होती. मात्र, भुवनेश्वरकुमार सोबत दुहेरी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या धोनीला मार्टिन गुप्टीलने धावबाद केले. गुप्टीलच्या त्या फेकीने भारतावर जणू 'बॉम्ब'च पडला...

गुप्टीलच्या त्या फेकीने भारतावर जणू 'बॉम्ब'च पडला...
विश्वकरंडक स्पर्धेत भारताने केलेली कामगिरी पाहता भारत सेमीफायन सहज जिंकेल असा विश्वास भारतीय संघाच्या चाहत्यांना होता. भारताची डावाची सुरुवात येवढी खराब होईल असा कोणी विचारही केला नव्हता. सुरुवातीला तर ३ बाद ५ धावा, अशी केविलवाणी स्थिती भारताची झाली होती. सुरुवातीचे फलंदाज लागोपाठ बाद झाल्याने संघाला त्यातून सावरणे फार मुश्कील झाले होते. ९२ धावा झाल्या असतानाच भारताचे ६ फलंदाज तंबूत दाखल झाले होते. या बिकट परिस्थितीत 'मॅच फिनिशर' अनुभवी महेंद्रसिंह धोनी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाने चाहत्यांच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या. या जोडीने ७ व्या गड्यासाठी 116 धावांची भागिदारी केली. मात्र, शेवटी सामना अतिशय अटीतटीत पोहोचला तेव्हा हे दोघे काही धावांच्या फरकाने लागोपाठ बाद झाले आणि भारताचा पराभव जवळपास निश्चित झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details