मँचेस्टर -सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना आज रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये हा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार असून स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्याला दुपारी ३ वाजता सुरुवात होईल.
CRICKET WC १st Semifinal : कॅप्टन हॉट विरुद्ध कॅप्टन कूल, आज भारत-न्यूझीलंड आमनेसामने - india vs new zealand
आजच्या सामन्यात भारताची भक्कम फलंदाजी विरुद्ध न्यूझीलंडची घातक गोलंदाजी असे चित्र पाहायला मिळणार आहे.
आजच्या सामन्यात भारताची भक्कम फलंदाजी विरुद्ध न्यूझीलंडची घातक गोलंदाजी, असे चित्र पाहायला मिळणार आहे. तुफान फॉर्मात असलेल्या हिटमॅन रोहित शर्माला न्यूझीलंडचे गोलंदाज रोखतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारताने स्पर्धेतील नऊपैकी सात सामने जिंकून अव्वल स्थान काबीज केले होते. तर, दणक्यात सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडला शेवटी पराभवाचे धक्के बसल्याने कसेबसे गुणतालिकेत चौथे स्थान प्राप्त झाले आहे.
भारतीय संघाने सातव्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. तर न्यूझीलंडच्या संघ आठव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघ 1983 आणि 2011 साली विश्वविजेता ठरला तर 2003 साली उपविजेता ठरला होता. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघाला 2015 साली केवळ एकदाच अंतिम फेरी गाठता आली. त्यात ते उपविजेते ठरले.
दोन्ही संघ -
- भारत -विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मयंक अगरवाल, रवींद्र जडेजा.
- न्यूझीलंड - केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, डी ग्रँडहोमे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, जिमी निशाम, हेन्री निकोलस, मिशेल सँटेनर, ईश सोधी, टीम साऊदी, टॉम ब्लंडेल.