लंडन - यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. धोनीने याबाबत काही खुलासा केला नसला, तरी तो कधी कोणता निर्णय घेईल याचा अंदाज करणे कठीण आहे. मात्र, आयसीसीने धोनीच्या निवृत्तीबाबत संकेत दिले आहेत.
CRICKET WC : आयसीसीने दिले धोनीच्या निवृत्तीचे संकेत!..शेअर केला व्हिडिओ
इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर, अफगाणिस्तानचा फलंदाज मोहम्मज शहजाद, विराट कोहली या सर्वांनी धोनीविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आयसीसीने धोनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर, अफगाणिस्तानचा फलंदाज मोहम्मज शहजाद, विराट कोहली या सर्वांनी धोनीविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार धोनी १४ जुलैला निवृत्ती घोषित करू शकतो. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत धोनीच्या संथ खेळीवर खूप टीका झाली होती. भारतीय संघाला धोनीने आयसीसीच्या तिन्ही प्रकाराचे विजेतेपद जिंकून दिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-२० विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक भारताला जिंकून देण्यात धोनीचा सिंहाचा वाटा आहे. भारत आजवर सातव्यांदा सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. भारताने अंतिम सामन्यापर्यंत पोहोचून विश्वचषक मिळविला, तर खऱ्या अर्थाने धोनीसाठी निवृत्ती घेणे सन्मानास्पद ठरणार आहे.