मुंबई - भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगने आज मुंबईत पत्रकार परिषद घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. युवराजने २०११ ची विश्वकरंडक स्पर्धा जिंकवण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला होता. कर्करोगाशी यशस्वी झुंज दिल्यानंतर युवराज अभिनेत्री हेजल कीचबरोबर विवाहबंधनात अडकला.
प्रेेमाचा प्रस्ताव अनेक वेळा धुडकावणारी हेजल अशी झाली युवराजची बायको... - hazal keech
युवराजने २०११ ची विश्वकरंडक स्पर्धा जिंकवण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला होता.
युवराजची हेजलसोबतची लव्हस्टोरी खूप स्पेशल आहे. युवी आणि हेजल २०११ मध्ये एका पार्टीत भेटले होते. हेजलला पाहताक्षणी युवी तिच्या प्रेमात पडला होता. हेजलजवळ जाऊन त्याने तिच्या अभिनयाची प्रशंसा केली. त्यानंतर एका 'कॉमन फ्रेंड्च्या' मदतीने युवराजने हेजलची माहिती मिळवली. इतकेच नव्हे तर त्या मित्रालाही हेजलपासून दूर राहायला सांगितले होते आणि तेव्हापासून युवराजची हेजलसोबतची लव्हस्टोरी सुरु झाली.
सुरुवातीला हेजलने युवराजला अनेक वेळा नकार दिला होता. परंतु, युवराजने शेवटपर्यंत हार मानली नाही. सलग तीन वर्षे-तीन महिने एकमेकांना जाणून घेतल्यानंतर युवी आणि हेजल मित्र झाले. त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर २०१५ मध्ये दोघांनी लग्नाची घोषणा केली.